औरंगाबादमध्ये 20 तासांनंतर एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण

December 4, 2010 9:39 AM0 commentsViews: 9

04 डिसेंबर

एअर इंडियाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. औरंगाबादहून दिल्लीला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानानं काल संध्याकाळी 7 वाजेपासून उड्डाण केलेले नाही. त्यामुळे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर प्रवासी अडकले आहेत. उड्डाण न होण्यामागे तांत्रिक कारण सांगितले जातं आहे. विमानतळावर जेवणाची तसेच निवासाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांनी आंदोलन सुरु केले.

अखेर प्रवाशांच्या आंदोलनाची दखल घेत 20 तासांनंतर एअर इंडियाचे विमान दिल्लीला रवाना झाले आहे.

close