जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी 7 जणांवर आरोपपत्र दाखल

December 4, 2010 10:53 AM0 commentsViews: 8

04 डिसेंबर

13 फेब्रुवारी 2010 ला पुणे शहरातील कोरेगावपार्क इथल्या जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात 17 निष्पाप लोकांचा बळी गेला आणि 20 जण जखमी झाले. या स्फोटातील आरोपींविरूध्द एटीएसने आरोपपत्र दाखल केलं आहे. हिमायतबेग या प्रमुख आरोपीसह 7 जणांविरूध्द हे आरोपपत्र दाखल केल आहे. यापैकी हिमायत बेग शिवाय इतर 6 जण फरार आहेत. 6 तारखेला आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी या चार्जशीटमध्ये काय आहे हे कळेल.

पुण्याच्या जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटाला 10 महिने उलटले आहेत. पण यामागे असलेल्या संघटनांपर्यंत पोहोचायला एटीएसला अजूनही म्हणावे तस यश आलेले नाही. स्फोटात सहभाग असलेल्या हिमायत बेग आणि शेख बिलाल चौधरीला एटीअएसने अटक केली.आज त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालं. हे आरोपपत्र एटीएसने पुणे सेशन कोर्टात दाखल केलं जाणार आहे.

close