अनिल कुंबळे दुखापतग्रस्त झाला

October 31, 2008 5:18 PM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर- दिल्ली, हेडनचा एक कठीण कॅच पकडताना कॅप्टन अनिल कुंबळेच्या डाव्या हाताला दुखापत झाली. मिश्राच्या बॉलिंगवर हेडनचा कॅच उडालाआणि मिड-विकेटवर उभ्या असणा-या अनिल कुंबळेनं कॅच पकडण्याचा जोरदार प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारात कुंबळेच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. यामुळे 38 वर्षीय कुंबळेला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर त्याला दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्याच्या हातावर टाके लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली नसल्यामुळे तो लवकरच मैदानात येऊन विकेट घेण्यासाठी तयार होईल, अशी आशा भारतीय टीम मॅनेजमेंटकडून व्यक्त केली जात आहे.

close