आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेत्या खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार

December 4, 2010 12:31 PM0 commentsViews: 2

04 डिसेंबर

चीनच्या ग्वांग्झाओमध्ये पार पडलेल्या 16 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने समाधानकारक कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने 14 गोल्डमेडलसह एकुण 64 मेडल्सची कमाई केली होती. भारताच्या या मेडलविजेत्या खेळाडूंचा आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात सत्कार करण्यात आला. क्रीडामंत्रालायने हा कार्यक्रम आयोजित केला होता. पण या सत्कार समारंभाला कॉमनवेल्थ आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं.आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रीडा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनाही कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. प्रतीक पाटील हे सध्या कलमाडी यांनी आयोजित केलेल्या पुणे मॅरेथॉनसाठी पुण्यात आले.

close