सांगलीत शालेय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी उत्तेजक द्रव्य घेतल्याची शक्यता

December 4, 2010 12:34 PM0 commentsViews: 3

04 डिसेंबर

सांगलीत राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्तेजक द्रव्यांचा वापर झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्तेजक द्रव्य आणि सीरिंज सापडली आहे. एका मंगल कार्यालयाच्या भिंतीच्या आडोशाला आणि बाथरुममध्ये खेळाडू या औषधांचे सेवन करत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या औषधांमध्ये टेस्टोलिक आणि न्युरोकाईंड या औषधांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं घेता येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडू उत्तेजक द्रव्यांचा वापर करत असल्याच्या घटना घडत असतात पण आता शालेय स्तरावरही असा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली.

close