कोकणात 25 हजार हेक्टरहून जास्त शेती मातीमोल

December 4, 2010 1:44 PM0 commentsViews: 4

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग

04 डिसेंबर

अवकाळी आलेल्या पावसाने भात पिक जमीन दोस्त केली आणि कोकणातला शेतकरी उध्वस्त झाला. जवळपास 25 हजार हेक्टरहून जास्त शेती मातीमोल झाली. आणि 10 टक्के पिकही शेतकर्‍यांच्या घरात गेलेले नाही.

सावंतवाडीतल्या चराठे गावातल्या महादेव गुरवांना यंदा खायचे काय हा प्रश्न पडला. 10 क्विंटल होणार्‍या पिकांपैकी अर्धा क्विंटलही भात त्यांना मिळालेला नाही शिवाय वैरणही वाया गेलं. जे काय मिळाल त्यातलं फुंकूनफुंकून वेचून काढावं लागतं. नोकरी नाही की दुसरे कुठले उदरनिर्वाहाचे साधन नाही.

हीच परिस्थिती कुणकेरीतल्या पुंडलीक सावंतांची. यांच्या शेतात अजुनही पाणी आहे. सगळे जुनं पिक पुन्हा रुजून आलं आहे. त्यामुळे हा खर्च भागणार तरी कसा असा त्यांना प्रश्न पडला आहे.सरकार नुकसान भरपाई देत नाही, मदत देतं असं सरकारकडूनच सांगितलं जातं. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 हजार शेतकरी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त आहेत. शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येतं. पण हेक्टरी फक्त 2 हजार रुपये म्हणजे गुंठ्याला जेमतेम 20 रुपयाची सरकारी भीक स्वीकारण्याच्या मनस्थितीत इथला शेतकरी नाही.

close