अवकाळी पावसामुळे फयानपेक्षा गंभीर परिस्थिती

December 4, 2010 3:15 PM0 commentsViews: 7

04 डिसेंबर

राज्यात अवकाळी पावसामुळे फयानपेक्षा गंभीर परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केले. तसेच शेती अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल करावे लागतील आणि शेतीची रचना बदलावी लागेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकारच्या आपत्तींना पीक विम्याच्या आधारेच सामोरं गेलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपत्तीनंतर मिळणार्‍या मदतीवरच शेतकर्‍यांनी अवलंबून राहू नये असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिला. जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचा अर्थसंकल्पावर कोणताही बोजा पडणार नाही याची सरकार काळजी घेईल. त्यासाठी कर पद्धतीत काही सुधारणा करता येतील. पण तुटीच्या अर्थसंकल्पाद्वारे पॅकेजचा खर्च केला जाणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

close