उत्तर भारतीय नेत्यांचं लक्ष्य आता विलासरावांचं सरकार

October 31, 2008 5:30 PM0 commentsViews: 26

31 ऑक्टोबर, दिल्ली गेले कित्येक दिवस उत्तर भारतीय नेते राज ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. पण आता उत्तर भारतीय नेत्यांच्या टीकेचा रोख बदलला आहे. विलासराव देशमुख सरकार टीकेचं लक्ष्य आहे. राज ठाकरे एकाच दिवसांत जामिनावर सुटले, म्हणून अमरसिंग विलासरावांच्या सरकारवर वैतागले आहेत. नेमका हाच मुद्दा लालूप्रसाद आणि रामविलास पासवान यांनी गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत उचलला. त्यांनी विलासराव देशमुख सरकारवर व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीमुळे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र धाडलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांपाठोपाठ खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुलच्या पाटण्यातील घराला भेट दिली आणि महाराष्ट्र पोलिसांवर शरसंधान केलं. एकूण काय तर आता राज ठाकरेंचा मुद्दा थोडा बाजूला झाला आहे. आता टीका महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांवर होऊ लागली आहे

close