नौदल सप्ताह साजरा

December 4, 2010 3:20 PM0 commentsViews: 12

04 डिसेंबर

दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नौदल सप्ताह साजरा केला जातो. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला चढवला होता. या युद्धात भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी नौदल सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त नौदलातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाचा मुख्य कार्यक्रम मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथं सुरु आहेत. नौदलाच्या कमांडोजचे रेस्क्यू ऑपरेशन, बॅन्ड पथक संचलन असे विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे. प्रात्यक्षिकात नेव्हीचे पाच लढाऊ हेलिकॉप्टर्स, पाच चेतक हेलिकॉप्टर सहभागी झाले. तर गेट वे समोरच्या अरबी समुद्रामध्ये नेव्हीचे आयएनएस विराट, आयएनएस दिल्ली यांसारख्या युद्ध नौका सज्ज आहेत.

close