जैतापूरचा इ.आय.ए रिपोर्ट अशास्त्रीय ? नव्याने अभ्यास करण्याची मागणी

December 4, 2010 3:36 PM0 commentsViews: 3

अलका धुपकर, मुंबई

04 डिसेंबर

जैतापूर प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी मिळाली आणि नवा वाद उफाळला. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांच्या भारत दौर्‍याच्या आधी जयराम रमेश यांनी घाईघाईत पर्यावरण क्लिअरन्स दिला असा आरोप करण्यात येतो. सार्कोझी दिल्लीमध्ये रिऍक्टर्ससाठीच्या प्राथमिक करारावर स्वाक्षर्‍या करतील असा अंदाज आहे. पण दुसरीकडे पर्यावरण विभागाची मंजुरीच वादात सापडली. निरीच्या माध्यमातून कोकण कृषी विद्यापीठाच्या फॉरेस्ट्री विभागाने करुन दिलेला अभ्यासच अपुरा असल्याचा दावा पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे.

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला मंजूरी देताना पर्यावरण मंत्रालयाने विचारात घेतला तो इ.आय.ए चा रिपोर्ट. म्हणजेच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट. पण हा इ.आय.ए रिपोर्टच सायंटिफिक नसल्याचा आरोप कोकण बचाव समितीने केला आहे. आणि काही अभ्यासकांनीही जैतापूर प्रकल्पासाठी नव्याने इ.आय.ए करण्याची मागणी केली आहे.

जैतापूरचा EIA अशास्त्रीय?

इकोसिस्टीमचा अभ्यास केला नाहीदुर्मिळ माडबन पठाराचा अभ्यास नाहीअणुऊर्जा परिणामांचा अभ्यास नाहीइ.आय.ए रिपोर्ट कोणत्याही ऍथोरिटीने तपासला नाहीफ्लोरिस्टिक आणि टॉक्सोनॉमिक अभ्यास अपूर्ण

close