जळगावमध्ये ग्रामपंचायतींचा विरोध डावलून वाळू ठेक्यांचे लिलाव

December 5, 2010 10:48 AM0 commentsViews: 89

05 डिसेंबर

राज्यात नदीपात्रातला वाळू उपसा करण्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरु झाली. पण त्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत ठराव आवश्यक आहे. ग्रामपंचायचीचा विरोध असल्यास वाळू उपशाचा ठेका दिला जात नाही. जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीनी लिलावाला विरोध केला. पण त्याकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने लिलाव प्रक्रिया सुरु केली. येत्या 8 तारखेला बोरी नदीतला वाळू उपसा होणार आहे. त्यामुळे मोंढाळे इथल्या संतप्त गावकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

अतिरिक्त वाळू उपसा केल्याने अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतीची नासाडी, पाणी पातळीत घट, बंधार्‍यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. अस्तित्वच धोक्यात येत असल्याने गावकर्‍यांनी वाळू उपसा ठरावाला विरोध केला आहे.

close