विविध मागण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवला

December 5, 2010 8:31 AM0 commentsViews: 5

05 डिसेंबर

सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गाड्यांचा ताफा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला. चिखली तालुक्यातल्या पेठ गावाजवळ हा ताफा अडवण्यात आला. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव, कृषीपंपाचे तोडलेले 50 हजार कनेक्शन पुन्हा जोडावेत आणि सावकारांना हडपलेल्या शेतकर्‍यांच्या जमीनी परत द्याव्यात या मागण्या यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्या.

close