चॅलेंजर ट्रॉफीमध्ये युवा खेळाडू चमकले

October 31, 2008 5:35 PM0 commentsViews: 7

भारताचे स्टार क्रिकेटर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी बिझी असल्यामुळे चॅलेंजर ट्रॉफीमध्ये त्यांची अनुपस्थिती जाणवली. तरीही काही प्लेअर्सने याकडे एक संधी म्हणून पाहिलं. भारतीय वन-डे टीममध्ये येण्यासाठी धडपडत असणा•या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी निवडलेल्या टीममध्ये रॉबिन उथप्पाला डच्चू देण्यात आला होता. त्यामुळे 22 वर्षीय उथप्पाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही चांगली संधी होती. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा उचलत तीन इनिंगमध्ये 216 रन्स केले. चॅलेंजर ट्रॉफीही इतर काही जणांसाठीही क्रिकेट प्रॅक्टीस म्हणून चांगली संधी होती. इरफान पठाण आणि रोहीत शर्माने स्पर्धेत काही अप्रतिम कॅचेस पकडत फिल्डींगची चांगलीच प्रॅक्टीस केली. बद्रीनाथनेही अप्रतिम खेळ करत टेस्ट मॅचमध्ये येण्यासाठी आपला दावा सिद्ध केलाय. स्पर्धेमध्ये इंडिया ब्ल्यू टीमने आपलं निर्वीवाद वर्चस्व गाजवलं. आपल्या लीग मॅचेस जिंकल्यानंतर त्यांनी फायनलमध्येही इंडिया रेड टीमचा धुव्वा उडवला. इंडिया ब्ल्यूचा कॅप्टन युवराज सिंगला मात्र खास कामगिरी करता आली नाही. इंग्लडविरुद्ध भारत नोव्हेंबरमध्ये सात वन-डे खेळणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारी भारताची टीम निवडली जाणार आहे.

close