कोची टीम आयपीएल सिझन 4 मध्ये खेळणार

December 5, 2010 12:43 PM0 commentsViews: 1

05 डिसेंबर

आयपीएल सिझन 4 मध्ये कोची आयपीएल टीम अखेर खेळणार का नाही याबद्दल काही दिवसांपासून शंका व्यक्त केली जात होती. मात्र आयपीएल गवनीर्ंग कौन्सीलची आज मुंबईत महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीत कोची टीम आयपीएल सिझन 4 मध्ये खेळणार आहे असा निर्णय घेण्यात आला.

कोची टीमला वाचवण्यासाठी टीम मालकांचे आता शेवटचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार शेअरहोल्डींग पॅटर्नमध्ये बदल करण्याची तयारी टीम मालकांनी दाखवली. त्याबाबतची सर्व कागदपत्र बीसीसीआयला त्यांनी गेल्या बैठकीत सादर केली होती. त्यामुळे या बदललेल्या शेअर होल्डींग पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर बीसीसीआयलानं हा निर्णय दिला. कोची टीमच्या या प्रस्तावावर बीसीसीआयने समाधान व्यक्त केले आहे. यामुळे कोची टीम आयपीएल सिझन चार मध्ये अखेर खेळणारे आहे. त्याचबरोबर कोची आणि पुणे टीमला परदेशी खेळाडू निवडण्यासाठी पहिली पसंती दिली जाणार आहे.

close