मुंबईत वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्सचा सन्मान

December 5, 2010 1:42 PM0 commentsViews: 7

05 डिसेंबर

पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा मंुबईतल्या एनसीपीए मध्ये सँक्च्युरी ऍवार्ड देऊन गौरव करण्यात आला. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्सचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यंदाच्या सँच्युरी अवार्डचे हे अकरावे वर्ष आहे. पर्यावरण संरक्षणासाठी काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमात क्रिकेटर अनिल कुंबळेही आवर्जून उपस्थित होता.

पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण म्हणजे कालपर्यंत तसे दुर्लक्षित विषय होते. त्यामुळे अलीकडच्या काळात यासंदर्भात वाढत चाललेली सजगता निश्चितच आशादायी ठरणारी आहे. या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍यांना सँक्चुरी ऍवार्डनं गौरवलं जाते. यंदा औरंगाबादच्या बैजू पाटील यांना फोटोग्राफर ऑफ द ईयरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.पर्यावरण रक्षणात बहुमोल कामगिरी करणारे गणेश वानखेडे, झिशान मिर्झा यांच्या कामाचाही यावेळी गौरव करण्यात आला.

close