आदर्शप्रकरणी आपली बदनामी करण्याचा कट होता- अशोक चव्हाण

December 5, 2010 1:43 PM0 commentsViews: 2

05 डिसेंबर

आदर्श प्रकरणामुळे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर अशोक चव्हाण आज पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले. चव्हाणांनी इथं रॅली काढली. आदर्श प्रकरणात आपण निर्दोष आहोत. पण काही लोकांनी आपली बदनामी करण्याचं षडयंत्र रचलंय, असा आरोप त्यांनी केला. बदनामीची सुपारी कुणी दिली हे लोकांना समजायला हवं, असंही ते म्हणाले. चौकशीतून सत्य बाहेर येईलच आणि लोक आपल्या सोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

close