पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

December 6, 2010 9:59 AM0 commentsViews: 21

06 डिसेंबर

सोलापुरच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात पद्मसिह पाटील आणि राणा जगजीत सिंह यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत विद्यमान सहा संचालकांच अपहरण केल्याची तक्रार शिवसेनेचेे माजी आमदार रविंद्र गायकवाड यांनी दाखल केली आहे. माजी मंत्री पद्मसिंह पाटील , त्यांचा मुलगा माजी मंत्री राणा जगजीतसिंग पाटील आणि सोलापुर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अद्यक्ष महेश गादेकर यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम 109, 465, 143, आणि 147 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close