वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या कोठडीतून 4 आरोपी फरार

December 6, 2010 10:58 AM0 commentsViews: 5

06 डिसेंबर

ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या कोठडीतून 4 आरोपी फरार झाले. या प्रकरणी दोषी पोलीसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. कळवा पोलिसांनी घरफोडीच्या आरोपाखाली आशीष भोसले, नितीन भोसले, विजू भोसले आणि गणेश भोसले या चौघांना अटक केली होती. कळवा इथटल्या पोलीस कोठडीत जागा नसल्यामुळे काल रात्री त्यांना वागळे इस्टेट येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज सकाळी आठच्या सुमारास खिडकीचा गज वाकवून त्या चौघांनी पलायन केले. त्यांना शोधण्याकरता पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली.

close