संसदेचं कामकाज सलग 17 व्या दिवशी ठप्प

December 6, 2010 11:36 AM0 commentsViews: 6

06 डिसेंबर

टू – जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या मुद्द्यावरून संसदेचं कामकाज आज (सोमवारी) सलग 17 व्या दिवशी ठप्प झालं. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी मागणी विरोधकांनी पहिल्या दिवसापासून लावून धरली. त्याला सरकार तयार नसल्याने कामकाज ठप्प झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आता सरकारने यूपीएच्या घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावली. आज संध्याकाळी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. यापूर्वी गेल्या दोन आठवड्यांत प्रणव मुखजीर्ंनी चारवेळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण त्या बैठकींना यश आलं नाही.

close