ज्येष्ठ कवी ग्रेस यांना जी.ए.सन्मान पुरस्कार जाहीर

December 6, 2010 12:28 PM0 commentsViews: 2

06 डिसेंबर

आशय सांस्कृतिक आणि जीए कुटुंबियांतर्फे दिला जाणारा जी. ए. सन्मान यंदा कवी ग्रेस यांना जाहीर झाला. आशय सांस्कृतिक तर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज ही माहिती देण्यात आली. जी. ए कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी जी.ए महोत्सवाचे आयोजन पुण्यात करण्यात येते. यंदा 11 आणि 12 डिसेंबर असे दोन दिवस हा सोहळा रंगणार आहे. शनिवारी 11 डिसेंबरला होणार्‍या कार्यक्रमात कवी ग्रेस यांना रामदास भटकळ यांच्या हस्ते जी. ए सन्मान प्रदान करण्यात येईल. तर दुसर्‍या दिवशी जी ए कथाकार पुरस्कार लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांना प्रदान करण्यात येईल. विजया राज्याध्यक्ष यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

close