ओबामा समर्थकांची भारतात जोरदार तयारी

October 31, 2008 6:05 PM0 commentsViews: 2

31 ऑक्टोबर, दिल्ली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.अवघ्या जगाचं लक्ष अमेरिकेतील निवडणुकीकडे लागलं आहे. बराक ओबामा यांना विजयी करण्यासाठी त्यांचे समर्थक जोरदार तयारी करत आहेत. बराक ओबामांच्या विजयासाठी भारतातही मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे. भारतात असलेल्या अमेरिकी नागरिकांनी ओबामांना मतदान करावं, यासाठी डेमोक्रेट अ‍ॅब्रोड इंडियाच्या माध्यमातून त्यांनी एक अभियान सुरू केलं आहे. ओबामा समर्थक असलेली लोरेना सध्या ओबामांच्या प्रचार अभियानात व्यस्त आहे. भारतात असलेल्या अमेरिकी नागरिकांना फोन करुन ती त्यांना मतदानाची आठवण करुन देते. 'ओबामा बुद्धीमान आहेत आणि ते जर जिंकले तर निश्चितच ते त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतील ' , असं लोरेना सांगत होती. विजयासाठी एक-एक मत महत्त्वाचं आहे आणि काही राज्यात तर याची आम्हाला फार गरज लागेल. दिल्लीतले ओबामांचे हे समर्थक फ्लॅटमध्ये रोज किमान 100 कॉल करुन भारतातल्या अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकेत मतदानाच्यावेळी फ्लोरिडा, मिन्नेसोता या प्रांतात विजयासाठी बरीच चुरस होण्याची शक्यता आहे. यावेळी एक-एक मत फार महत्त्वाचं ठरणार आहे.

close