जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण सत्र न्यायालयात चालणार

December 6, 2010 12:32 PM0 commentsViews: 7

06 डिसेंबर

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी हिमायत बेग आणि बिलालला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. हिमायतला पुणे कोर्टात तर बिलालला नाशिक कोर्टात हजर केले जाईल. शनिवारी आरोपींविरूध्द एटीएसने आरोपपत्र दाखल केले. हिमायत बेग या प्रमुख आरोपीसह 7 जणांविरूध्द हे आरोपपत्र दाखल केले आहे. यापैकी हिमायत बेग वगळता इतर 6 जण फरार आहेत.

पुण्यात आरोपी हिमायत बेगला आज कोर्टात हजर करण्यात आले असता त्याच्यावर न्यायालयाने अडीच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. तसेच यापुढे हा खटला सत्र न्यायालयात चालणार आहे.

close