मोहली वन परिक्षेत्रात मृतावस्थेत वाघाचा बछडा सापडला

December 6, 2010 8:26 AM0 commentsViews: 1

06 डिसेंबर

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणा-या मोहली वन परिक्षेत्रात आज सकाळी सव्वा वर्षाचा मादी बछडा मृतावस्थेत आढळला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असल्याची शंका व्यक्त केली जाते. इथल्या मालगुप्पारी तलावापासून दीडशे मीटर अंतरावर हा बछडा सापडला. नर वाघाने या मादी बछड्याला तलावापासून दीडशे मीटरपर्यंत खेचत नेल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असं इथल्या वनाधिका-यांचं म्हणणं आहे. वाघाचा बछडा मृतावस्थेत सापडण्याची या वर्षातली ही पहिलीच वेळ आहे.

close