नाशिकमध्ये शेतकरी आत्महत्येची पाचवी घटना

December 6, 2010 2:26 PM0 commentsViews: 3

06 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानाचा फटका सगळ्यात जास्त नाशिक जिल्ह्याला बसला. नाशिकजवळच्या ओझरमध्येही संजय निंबाळकर या शेतकर्‍याने आत्महत्या केली. हा भाजीउत्पादक शेतकरी आहे. द्राक्षउत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनंतरची नाशिकमधली ही पाचवी आत्महत्या आहे. तर भिवंडी – वाडा तालुक्यातील कासघर इथं शेतपिकांचे नुकसान झाल्याने एका शेतकर्‍यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. गोविंद पाटील असं त्यांचं नाव आहे.

close