समता सैनिक दलाची चैत्यभूमीवर परेड

December 6, 2010 2:47 PM0 commentsViews: 4

06 डिसेंबर

मुंबईत चैत्यभूमीवर आज भीमसागर उसळला. समता सैनिक दलानंही महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर एक परेड काढली. शेकडो मुलं शिस्तबद्ध पद्धतीनं या परेडमध्ये सहभागी झाली होती. बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचा संदेश त्यांनी आपल्या या परेडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

close