विमानतळाच्या मंजुरीनंतर नवी मुंबईत जागांचे भाव वाढले

December 6, 2010 2:49 PM0 commentsViews: 3

06 डिसेंबर

नवी मुंबई विमानतळाच्या मंजुरीनंतर घरांचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबईत भरवण्यात आलेल्या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये त्याचा प्रत्यय आला. यात जागांचे भाव वाढल्याचं दिसून आलं. विमानतळाच्या मंजुरीनंतर मात्र नवी मुंबईत घर घेण्यासाठी लोकांनी या एक्झिबिशनला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चार दिवसात या एक्झिबिशनमध्ये दोन ते अडीच हजार घरांचे बुकिंग झाले. यामुळे अडीच हजार कोटींचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येते. नेरुळ, पनवेल, उलवे, कामोठे आणि खारघर या भागात घरांची मागणी मोठ्याप्रमाणात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बिल्डरांनी कमी किंमतीत घरं देण्याच्या स्कीमही तयार केल्या होत्या.

close