दिवसअखेर ऑस्ट्रेलिया चार विकेट्सवर 338 धावा

October 31, 2008 6:12 PM0 commentsViews: 5

31 ऑक्टोबर – दिल्ली,ऑस्ट्रेलियानं आज सावधं सुरुवात करत दिवसअखेर चार विकेट्सवर 338 रन्सपर्यंत मजल मारली. पॉण्टिंगची हुकलेली सेंच्युरी आणि हेडन, कॅटीच आणि हसीनं झळकावलेली हाफ सेंच्युरी हे ऑस्ट्रेलियन इनिंगचे वैशिष्ट्य ठरले.दिवसाची सुरुवातच झहीर खाननं दणक्यात केली आणि मॅथ्यू हेडनला दिवसाच्या पहिल्या बाऊसरला सामोरं जावं लागलं. या धक्क्यामुळे हेडन जागा झाला आणि कॅटीच सोबत त्यानं हळूहळू चांगली पार्टनरशिप उभारायला सुरुवात केली. कॅटीचनं या सीरिजमधली त्याची दुसरी हाफ सेंच्युरी पूर्ण केली पण मिश्राच्या अचूक बॉलिंगला तो बळी पडला.64 रन्सवर त्याला तंबूत परत जावं लागलं. या पूर्ण सीरिजमध्ये फेल गेल्यामुळे हेडन मोकळा खेळत नव्हता. सावध खेळत त्यानं हाफ सेंच्युरी पूर्ण केली. मग पाँटींगसोबत स्कोरमध्ये आणि 79 रन्सची भर पडली. सेहवागने हेडनची विकेट काढली. 83 रन्सवर असताना त्याचा कॅच पकडला.पॉण्टिंगनं 50 रन्स केले. टी टाइमपर्यंत ऑस्ट्रेलियानं एकही विकेट पडू दिली नाही. अखेर सेहवागनंच ऑस्ट्रेलियन कॅप्टनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बॉल जबरदस्त वळला आणि सेंच्युरी पूर्ण करायला फक्त 13 रन्स बाकी असताना पॉण्टिंग आऊट झाला. 50 रन्सचा टप्पा पार करणारा हसी ऑस्ट्रेलियाचा चौथा बॅट्समन ठरला. तो धोकादायक दिसत असताना पुन्हा एकदा सेहवागनंच त्याची इनिंग संपवली. तेव्हा ऑस्ट्रेलिया 275 रन्सनं मागे होते. दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता 338 रन्सवर 4 विकेट्स.

close