जैतापूर प्रकरणी मध्यस्थीसाठी अण्णांची तयारी

December 6, 2010 5:36 PM0 commentsViews: 6

06 डिसेंबर

प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन होणार असेल, तर प्रकल्पाला आपला विरोध नाही, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. तसेच सर्वांच्या भल्यासाठी प्रकल्पाचे समर्थक आणि विरोधक यांच्यात चर्चेसाठी मध्यस्थी करायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आयबीएन-लोकमतच्या प्राईम टाईममध्ये बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच विरोध अन्यायकारक मार्गाने दडपण अयोग्य असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

close