विधानसभेत आदर्श घोटाळ्यावर बुधवारी चर्चा

December 7, 2010 1:11 PM0 commentsViews: 2

07 डिसेंबर

अखेर आदर्श वादावरुन विधानसभेत सुरु असलेली सरकारची कोडीं सुटली आहे. आदर्श घोटाळ्यावर उद्या चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. तसेच आज विदर्भाच्या अनुशेषावर चर्चा झाली आहे. दरम्यान आज विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज दोनवेळा तहकूब करावं लागले. सभागृहात गोंधळ सुरु असतांना सरकारने आवाजी मतदानाने पुरवणी मागण्या मंजूर करुन घेतल्या. जवळपास 7 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेत सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आदर्श मुद्यावर चर्चा व्हावी या मागणी विधान परिषदेत विरोधक ठाम होते. त्यामळेच विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करावं लागले.

आदर्शच्या दुसर्‍या टप्प्याची तयारी सुरू होती – रामदास कदम

विधानपरिषदेमध्ये आज रामदास कदम यांनी आणखी एक सनसनाटी आरोप केला. आदर्शच्या दुसर्‍या टप्प्याची तयारी सुरू होती असं सांगणारी काही पत्रं त्यांनी परिषदेत दाखवली. नारायण राणे मुख्यमंत्री असताना आदर्शला मिळालेल्या परवानगीबद्दल आणि 2007 साली ते महसूलमंत्री असताना फेज 2 बद्दलचे अशी दोन पत्र आज त्यांनी विधानपरिषदेत दाखवली.

close