जळगावात ठेवीदारांची चिता आंदोलन

December 7, 2010 11:03 AM0 commentsViews: 3

07 डिसेंबर

ठेवीदांराच्या भल्याच्या घोषणा करणार सरकार आणि सहकार खाते हे भ्रष्टाचाराने पोखरल्याचा आरोप मनसे ठेवीदार संघटनेने केला आहे. जळगांवला या संघटनेने ठेवीदारांची चिता हे आंदोलन करुन सरकारचा निषेध केला. ठेवीदारांच्या प्रश्नासह पक्षाकडेही सरकारचे लक्ष वेधण्याच्या प्रयत्न करणा-या मनसे ठेवीदार संघटनेने आज जळगांवच्या या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाकडाची चिता रचली होती. ठेवींचे पैसे परत मिळणे बंद झाल्याने अनेक कौटुंबिक अडचणी या ठेवीदारांपुढे निर्माण झाल्या आहेत. मुलांचे शिक्षण,मुलीचे लग्न,आजारपणासाठी लागणारा पैसा हा सगळांच अडकल्याने आमच्या हातात फक्त आता आयुष्य संपवणं एवढंच राहिलं असल्याचं या हतबलं ठेवीदारांचं म्हणणं आहे. आमची चिंता आता चितेकडे जात असल्याने सरकारन आम्हालाअग्नि द्यावा असे या ठेवीदारांचे आवाहन होते.

close