द्राक्ष उत्पादकांच्या कर्जावरच्या व्याजात दोन वर्षांची सूट

December 7, 2010 11:05 AM0 commentsViews: 7

07 डिसेंबर

द्राक्ष उत्पादकांच्या कर्जावरच्या व्याजात दोन वर्षांची सूट देण्यात आली. कृषीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या हफ्त्यात आणि व्याजातही सवलत देण्याचा सरकार विचार करत असल्याचे ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे यंदाही द्राक्ष उत्पादकांचे मोठ नुकसान झाले. गेली तीन वर्ष नाशिकमधले द्राक्ष उत्पादकांना फटका बसत आहेत. अहमदनगरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत कृषीमंत्र्यांनी ही घोषणा केली.

close