विकिलिक्सचा संस्थापक ऍसांजला लंडनमध्ये अटक

December 7, 2010 3:13 PM0 commentsViews:

07 डिसेंबर

विकिलिक्स या वादग्रस्त वेबसाईटचा संस्थापक ज्युलियन ऍसांज याला लंडनमध्ये अटक झाली. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. ऍसांज याच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे आहेत. त्यासाठी त्याला स्वीडनमध्ये वॉन्टेड घोषित करण्यात आले होते. विकिलिक्स या वेबसाईटवरून अनेक खळबळजनक गोपनीय कागदपत्र उघड करण्यात आली आहेत. त्यामुळे अमेरिका अडचणीत आली. दरम्यान, ऍसांज यांची अटक म्हणजे प्रसारमाध्यमांच्या स्वांतत्र्यावर हल्ला आहे. मात्र त्यांच्या अटकेनंतरही आम्ही भंाडाफोड करतच राहू अशी प्रतिक्रिया विकीलीक्सच्या प्रवक्त्यांनी दिली.

close