जागेच्या वादातून 5 वर्षाच्या मुलीला धावत्या ट्रेनमधून फेकले

December 7, 2010 3:23 PM0 commentsViews: 5

07 डिसेंबर

तुम्ही जागा का अडवून धरलीत असं म्हणत 5 वर्षीय मुलीला धावत्या ट्रेनबाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. यात 5 वर्षाची चिमूकली गंभीर जखमी झाली. तिच्यावर सायन रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. चैत्यभूमीवर आंबेडकरांना अभिवादन करुन जमनाळे कुटुंबिय मुंबई- भुसावळ पॅसेंजरने कल्याणला निघाले होते.आरोपी छोटू देवानंद शर्मा दादरमध्ये रेल्वेत चढला. तसेच जागेच्या वादावरुन या मुलीला गाडीच्या घाटकोपर ते विद्याविहार दरम्यान खाली फेकले. यावेळी डब्यातल्या प्रवाशांनी माथेफिरु शर्माला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुध्द खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

close