छटपूजेत राजकीय होर्डिंग्ज लावण्यावर बंदी

November 1, 2008 6:32 AM0 commentsViews: 3

1 नोव्हेंबर, मुंबईछटपूजेच्या निमित्तानं राजकीय होर्डिंग्ज लावण्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. ज्या ठिकाणी छटपूजा होईल, त्याठिकाणी राजकीय होर्डिंगज लावण्यात येवू नये,असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. छटपूजेसाठी रात्री 10 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच हा निर्णय घेतल्याचं मुंबईचे कलेक्टर विश्वास पाटील यांनी स्पष्ट केलं.राज ठाकरे यांनी छटपूजेनिमित्त होणार्‍या राजकीय शक्तिप्रदर्शनावर कडाडून टीका केली होती. त्यावरून त्यांची उत्तर भारतीय नेत्यांशी चांगलीच जुंपली होती. लालूप्रसाद यादव यांनी शिवाजी पार्कवर छटपूजा करण्याची घोषणा केली होती. मात्र काही दिवसांनी त्यांनी ती मागे घेतली. काल राज ठाकरेंनेही आपली भूमिका सौम्य केली होती. मात्र तरीही छटपूजेदरम्यान राज्य सरकार कोणताही धोका पत्कारण्यास तयार नाही, हे या घोषणेवरून स्पष्ट झालं आहे.

close