वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणी तीन संशयित ताब्यात

December 8, 2010 1:04 PM0 commentsViews: 4

08 डिसेंबर

वाराणसी बॉम्बस्फोटप्रकरणी उत्तरप्रदेश एटीएसने तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. शहानवाझ आणि असादुल्लाह अशी त्यांची नाव आहेत. हे दोघे मुख्य संशयित आहेत. 2008 मधले दिल्लीतले बॉम्बस्फोट आणि बाटला हाऊस एन्काऊंटरशी या दोघांचा संबंध आहे. शहानवाझ आझमगडचा आहे. अलीकडे तो मध्य आशियात होता. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज वाराणसीला भेट दिली. केंद्र सरकारनं काही राज्यांना संभाव्य हल्ल्यांचा इशारा दिला होता. पण उत्तरप्रदेशच्या मायावती सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप त्यांनी केला. लोकांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले.

वाराणसी बॉम्बस्फोटामागे भटकळ बंधूचा हात असल्याचा दावा मुंबई पोलीस आयुक्त संजीव दयाल यांनी केला आहे. दरम्यान वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिदीन संघटनेने जबाबदारी घेणारा ई-मेल पाठवला. हा मेल नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 17 इथून पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी सेेक्टर 17 मधल्या मानसरोवर बिल्डिंगमधून अखिल तलरेजा आणि निखील तलरेजा या दोघा भावांना काल रात्री उशिरा ताब्यात घेतले. पण चौकशींअंती ते दोघंही निर्दोष असल्याचे लक्षात आले. या दोघांचाही मेल हॅक करुन वापर करण्यात आला.

close