आदर्श प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांचा आयोग नेमणार – मुख्यमंत्री

December 8, 2010 1:36 PM0 commentsViews: 1

08 डिसेंबर

आदर्श प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांचा आयोग नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यातील एक सदस्य निवृत्त न्यायाधीश असतील तर दुसरे सदस्य हे मुख्य सचिवांपेक्षा मोठे पद भूषवलेले माजी अधिकारी असतील. सोसायटीची मालकी कुणाची आहे, याची चौकशी सध्या सुरू असून सीबीआयला कागदपत्र देण्याचे काम सध्या सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी सध्या दोन खटले कोर्टात सुरू आहे. राज्य सरकारच्या पातळीवरच्या 21 अधिकार्‍यांनी आदर्शमध्ये फ्लॅट्स घेतले आहेत. या अधिकार्‍यांना त्यांनी केलेल्या व्यवहारांची माहिती देण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली असून या सोसायटीमध्ये ज्या 12 आदर्श आयएएस आणि 21 अधिकार्‍यांनी फ्लॅट्स मिळवले आहेत त्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असल्यास त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

close