ए. राजा यांच्या घरावर सीबीआयचे छापे

December 8, 2010 1:49 PM0 commentsViews: 5

08 डिसेंबर

माजी मंत्री ए.राजांच्या घरावर सीबीआयनं छापे टाकले. त्यांच्या चेन्नई आणि दिल्लीतल्या घरावर छापे टाकण्यात आलेत. 10 ते 12 सीबीआय अधिकार्‍यांच्या टीमने ए राजाच्या दिल्लीच्या घरी छापे टाकले. सकाळी 6 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात झाली आणि एकूण 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून तपास अजूनही सुरू असल्याची माहिती सीबीआयच्या प्रवक्त्या विनिता ठाकूर यांनी दिली. ए.राजा यांच्या जवळच्या इतर चार अधिकार्‍यांच्या घरावरही छापे टाकण्यात आलेत. त्यात राजा यांचे खासगी सचिव आर.के.चंडोलिया, माजी दूरसंचार सचिव सिध्दार्थ बेहूरीया, के. श्रीधर आणि ए.के. श्रीवास्तव यांचा समावेश आहे. राजा यांच्या भावाची आणि बहिणीचीही चौकशी करण्यात आली.

close