किंग्ज इलेव्हन पंजाब टीमला कोर्टाचा दिलासा

December 8, 2010 1:53 PM0 commentsViews: 4

08 डिसेंबर

राजस्थान रॉयल्स पाठोपाठ आयपीएलमधल्या किंग्ज इलेव्हन पंजाब टीमलाही कोर्टाचा दिलासा मिळाला. मुंबई हायकोर्टाने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या निलंबनला स्थगिती दिली. ही स्थगिती तात्पुरत्या स्वरुपाची आहे. त्यामुळे खटल्याची सुनावणी सुरु असेपर्यंत टीम मालकांना 18 मिलीअन डॉलर्स सिक्युरिटीच्या स्वरुपात जमा करावे लागणार आहेत. किंग्ज इलेव्हन टीमच्या मालकी हक्कांमध्ये संदिग्धता आढळल्यामुळे बीसीसीआयने ही टीमच रद्द केली होती. या निर्णयाविरुद्ध पंजाब टीमने कोर्टात धाव घेतली. त्याबाबतच ही सुनावणी सुरु आहे.

close