अण्णांनी शब्द जपून वापरावे – कोळसे पाटील

December 8, 2010 3:14 PM0 commentsViews: 4

08 डिसेंबर

कितीही वेळा अटक आणि कारावास झाला तरीही आता यापुढे जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधी आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी म्हटले आहे. कोळसे पाटील आणि वैशाली पाटील यांना प्रकल्पाविरोधी आंदोलनात अटक करण्यात आली होती. आज बुधवारी चार दिवसाच्या अटकेनंतर रत्नागिरी कारागृहात आज सुटका झाली. प्रकल्पाला समर्थन देणार्‍या अण्णा हजारे यांच्यावर यावेळी कोळसे पाटील यांनी सडकून टिका केली. ज्या विषयात आपल्याला माहिती नाही त्यात विषयाबद्दल अण्णांनी बोलू नये अस सांगतांना ज्या समाजाने अण्णांना मोठ केल त्या समाजापुढे अण्णांनी शब्द जपून वापरावे असही ते म्हणाले.

close