रामानंद तिवारी यांची ‘भ्रष्ट नगरी’

December 8, 2010 4:21 PM0 commentsViews: 3

आशिष जाधवसह विनय म्हात्रे, मुंबई

08 डिसेंबर

नगरविकास खात्याचे तत्कालीन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांनी केवळ आदर्शच नाही, त्याचबरोबर इतर अनेक ठिकाणीही आपल्या गैरकारभाराचे ठसे उमटवले आहे.

रामानंद तिवारी हे नगरविकास खात्याचे तत्कालीन प्रधान सचिव. एक नाही दोन नाही तर तब्बल सहा वर्षे नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव पदावर त्यांनी काम केले. आणि शेवटच्या वर्षी म्हणजे सातव्या वर्षी त्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती मिळाली. रामानंद तिवारी यांच्याच काळात नगर विकास खात्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईतसह शहरी भागात बांधकाम करण्यासाठी नगररचना कायद्यांत बिल्डरच्या हिताच्या ज्या सुधारणा झाल्या त्यामागे डोक लावलं ते रामानंद तिवारी यांनी. याच रामानंद तिवारी यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याच्यावरुन आज विधीमंडळातही जोरदार चर्चा झाली.

बिल्डरांच्या हिताचे कायदे बनवणार्‍या रामानंद तिवारी यांनी मुंबई आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी फ्लॅट्स आणि जमिनींच्या माध्यमातून मोठी माया जमवल्याचा आरोप शेकापच्या आमदार मीनाक्षी पाटील यांनी केला आहे.केवळ मुंबई आणि नवी मुंबईतच नाही तर रायगड जिल्ह्यातही या रामानंद तिवारी यांनी त्यांच्या आणि कुटुंबियांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. तिवारी सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांनी इतका भ्रष्ट कारभार केलेला असतानासुद्धा सरकारने त्यांची माहिती आयुक्तपदी नियुक्ती केली. याला विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

तिवारींचे मुंबईतले फ्लॅट

- अमलतास हौसिंग सोसायटी, जूहू वर्सोवा रोड- रेणुका हौसिंग सोसायटी, कलानगर, वांद्रे- इंडस हौसिंग सोसायटी, वडाळा- व्हीनस हौसिंग सोसायटी, पामबीच रोड, नवी मुंबई

ट्रस्टच्या नावावरही जमीन

- सानपाडामध्ये जय पुरिअर ट्रस्टच्या नावावर 3500 स्क्वे. मीटरचा भूखंड- हा भूखंड 315 रुपये प्रति स्क्वे. मीटर या दरात मिळाला- 2005 साली हा भूखंड मिळाला- राखीव भूखंडाच्या केवळ 10 टक्के दरानं भूखंड मिळाला

शाळेच्या भूखंडासाठीचे निकष

- किमान तीन वर्षांपासून शाळा सुरु असायला हवी- तीन वर्षांचा दहावीचा निकाल 80 % टक्के असणं गरजेचं

close