विद्यार्थांचं ‘कपडे काढो’ आंदोलन

December 8, 2010 10:40 AM0 commentsViews: 5

08 डिसेंबर

विद्यार्थांची पिळवणूक करणार्‍या शैक्षणिक संस्थावर कारवाई करा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आज कोल्हापुरात आंदोलन केले. अखिल भारतीय नौजवान सभेच्यावतीने 'कपडे काढो' हे अभिनव आंदोलन करण्यात आले. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍन्ड मॅनेजमेंट आणि सिगल ऍव्हीएशन ऍकॅडमी या संस्थेच्या प्रशासनाकडून विद्यार्थावर अन्याय होतंय. अशी तक्रार अखिल भारतीय नौजवान सभेने शिक्षण संचालक, शिवाजी विद्यापीठ प्रशासन आणि जिल्हाधिकार्‍यांच्याकडे केली होती. पण संबधित संस्थेवर अजूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतापलेल्या नौजवान सभेच्या विद्यार्थांनी 'कपडे काढो' आंदोलन केलं.

close