भाजपच्या कार्यकाळातील स्पेक्ट्रम वाटपाची चौकशी व्हायला हवी !

December 8, 2010 5:08 PM0 commentsViews: 1

08 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं आज भाजपलाही दणका दिला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारच्या काळातल्या स्पेक्ट्रम वाटपाचीही चौकशी व्हायला हवी, असं कोर्टाने सीबीआयला सांगितले. 2001 साली भाजपचे प्रमोद महाजन दूरसंचार मंत्री होते. त्यामुळे भाजप बॅकफूटवर गेली आहे. पण तरीही या घोटाळ्यासाठी जेपीसी स्थापन करण्यात यावी, या मागणीवर ते ठाम आहेत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी स्पेक्ट्रमचे लायसन्स मिळवणार्‍या कंपन्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा का केला, असा सवालही सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. पत नसतांनाही या कंपन्यांना बॅकांनी भरमसाठ कर्जपुरवठा केला असा शेरा कोर्टाने मारला.

close