खासगी शाळांसाठी फी वाढ नियंत्रण कायदा करणार – राजेंद्र दर्डा

December 9, 2010 1:47 PM0 commentsViews: 13

09 डिसेंबर

खासगी शाळांच्या भरमसाठ फी वाढीला आता चाप बसण्याची शक्यता आहे. लवकरच सरकार फी वाढ नियंत्रण कायदा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानसभेत दिली. खाजगी शाळांची फी निश्चित करण्याचा 15 जुलै 2010 चा जीआर मुंबई हायकोर्टाने रद्द केला होता. आता न्याय आणि विधी विभागाचा सल्ला घेऊन फी निश्चित करण्याबाबत कायदा करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. पुढच्या बजेट अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाईल. तर शाळांमध्ये पीटीए म्हणजेच पालक-शिक्षक संघटना नाहीयेत त्यांनी तातडीने पीटीए स्थापन कराव्यात. नाहीतर ज्या शाळांमध्ये पीटीए नाहीत त्या शाळांना नोटीस बजावणार असल्याची माहितीही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधानसभेत दिली.

close