टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी समितीची घोषणा

December 9, 2010 1:56 PM0 commentsViews: 2

09 डिसेंबर

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी एक समितीची घोषणा दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी केली आहे. टेलिकॉम लायसन्स देण्यात झालेल्या घोटाळ्याची ही समिती चौकशी करणार आहे. ही एकसदस्यीय समिती आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश शिवराज वीर पाटील या समितीचे अध्यक्ष असतील. 2001 पासूनच्या टेलिकॉम लायसन्स वाटपाची ही समिती चौकशी करणार आहे. त्यामुळे एनडीए सरकारच्या काळातली टेलिकॉम वाटपाची प्रक्रियाही चौकशीअंतर्गत येणार आहे.

close