संसदेचं कामकाज 20 व्या दिवशीही ठप्प

December 9, 2010 2:00 PM0 commentsViews: 1

09 डिसेंबर

आज 20 व्या दिवशीही संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. जेपीसीच्या मागणीवरून संसदेतली कोंडी कायमच आहे. संसदेच्या इतिहासात एवढे दिवस कामकाज बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2 जी प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षांची आहे. पण सरकार मात्र अशा चौकशीसाठी तयार नाही. या आधीही जेपीसीच्याच मुद्यावरून संसदेचं कामकाज सर्वाधिकाळ बंद राहिलं होतं. 1987 मध्ये बोफोर्स प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करावी यासाठी विरोधी पक्षांनी 19 दिवस तर हर्षद मेहेताच्या शेअर बाजार घोटाळ्याची चौकशीसाठी याच मुद्यावर 16 दिवस कामकाज बंद पाडलं होतं. या दोनही वेळी सरकारनं जेपीसीची मागणी मान्य केली होती. संसद ठप्प असल्यानं कोट्यवधी रूपये पाण्यात गेले असा आरोप करण्यात येतोय.

close