लवासा प्रकरणी पर्यावरण मंत्रालयात सुनावणी सुरु

December 9, 2010 2:54 PM0 commentsViews: 1

09 डिसेंबर

लवासा प्रकरणाची सुनावणी आज दिल्लीतल्या पर्यावरण मंत्रालयात झाली. लवासा शहर बांधत असताना आम्ही पर्यावरणाची काळजी घेत आहोत. असं यावेळी लवासाच्या अधिका-यांनी प्रझेंटेशनद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच बांधकामासाठी गरजेच्या असलेले सर्व परवाने लवासाने घेतले आहेत असंही यावेळी लवासा कॉर्पेरेशनने सांगितले. या बैठकील कोर्टाच्याच आदेशनुसार मेधा पाटकर आणि इतर लवासा विरोधी कार्यकर्तेही उपस्थित होते. या वेळी मेधा पाटकर यांनी लवासाची बाजू खोडून काढत लवासाने केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी घेणं गरजेचे होते असं सांगितले. आज सुनावणी पूर्ण झाली असून उद्या दोन्ही बाजुंकडून कागदपत्र मंत्रालयाला सादर केली जातील.

close