जळगावात 60 हजारांच्या नकली नोटा जप्त

December 9, 2010 3:10 PM0 commentsViews: 2

09 डिसेंबर

जळगाव जिल्ह्यांत बनावट नोटा चलनात आणल्या जाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील या आदेशबाबाला पोलीसांनी अत्यंत शिताफीने ताब्यांत घेतले. तब्बल 60 हजारांच्या नकली नोटा या भिवसन सखाराम गोपाळ उर्फ आदेशबाबाकडून पोलिसांनी जप्त केल्या आहेत.आता या तपासाचे धागेदोरे पार मुंबईपर्यंत पोहोचले आहे. आदेशबाबाने अंधश्रध्देचा वापर करुन या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला खरा. पण या नकली नोटा त्याच्याकडे आल्या कुठुन ? आत्तापर्यंत किती लाखाच्या नोटा त्याने चलनात आणल्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.पण ही घटना जळगांव जिल्ह्यात काही पहिलीच नाही.

जळगावात यापूर्वीच्या घटना

1 डिसेंबर – मुक्ताईनगरला 60500 च्या नकली नोटांसह 2 ताब्यांत28 ऑक्टोबर – 1 लाख 55 हजारांच्या रुपये 1हजाराच्या नोटा सराफ बाजारात जप्त17 जुलै – जळगांवला 85 हजारांच्या नकली नोटांचा व्यवहार करतांना 2 रेडहॅड ताब्यांत16 जून – 54 हजारांच्या नकली नोटांसह 1 सराफ बाजारात ताब्यांत

close