पुण्यात झालेल्या युथ कॉमनवेल्थ गेम्सचं ऑडिट पूर्ण झालेलं नाही

December 9, 2010 3:58 PM0 commentsViews:

प्राची कुलकर्णी, पुणे

09 डिसेंबर

पुण्यात झालेल्या युथ कॉमनवेल्थ गेम्सच्या व्यवहारांची चौकशी तर सोडाच पण या गेम्सचं ऑडिटही अजून पूर्ण झालेलं नाही. कॉमनवेल्थ युथ गेम्सचे सगळे हिशोब पूर्ण केले असल्याचा दावा सुरेश कलमाडी यांनी केला होता. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे.

2008 साली झालेल्या युथ कॉमनवेल्थ गेम्ससाठी मोठं बजेट मंजूर करण्यात आलं होतं. यात बालेवाडी स्टेडियमच्या रिनोव्हेशनचाही समावेश होता. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी जेव्हा हा हिशोब मागितला त्यानंतर त्यांना अवघ्या दीड पानांवर तयार करण्यात आलेला हिशोब देण्यात आला. तेव्हाचे अर्थमंत्री सुनिल तटकरे यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येण्यात असल्याचं आश्‍वासन दिलं होतं.

युथ कॉमनवेल्थचा सगळा हिशोब क्रीडा मंत्रालयाकडे आलाआणि त्याची लवकरच त्याची चौकशी करू असा दावाही सुनील तटकरेंनी केला होता. मात्र आता कुंभार यांना क्रीडा संचलनालयाने जो ई मेल पाठवलाय त्यात या खर्चाचे ऑडिट अजूनही झालं नाही हे स्पष्ट झाले.

close