पुण्यात सुलभा देशपांडे यांना तनवीर सन्मान

December 9, 2010 4:25 PM0 commentsViews: 13

09 डिसेंबर

पुण्यात रूपवेध प्रतिष्ठानचा तनवीर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. सुलभा देशपांडे यांना तनवीर सन्मान देण्यात आला तर अभिनेत्री वीणा जामकर यांना तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार दिला गेला. नाना पाटेकरच्या हस्ते हा गौरव केला गेला. यावेळी मान्यवरांबरोबरचा गप्पांचा कार्यक्रमही रंगला. इरावती कर्णिकनं वीणा जामकर यांची मुलाखत घेतली. तर माधव वझे यांनी सुलभा देशपांडे यांची मुलाखत घेतली. श्रीराम लागू आणि दीपा श्रीराम यांचा मुलगा तनवीरच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.

close