इंडियन मुजाहिद्दीनचं देशभरात जाळं

December 9, 2010 4:52 PM0 commentsViews: 6

अजित मांढरे,मुंबई

09 डिसेंबर

वाराणसीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर इंडियन मुजाहिद्दीनच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. या स्फोटाचे मॉडयुल नेमकं कोणतं आहे आणि यामध्ये कोण कोण अतिरेकी सामील आहेत या गोष्टी आता उघड होत आहे.

मुंबई पोलिसांनी इंडियन मुज्जाहिद्दीनच्या वीस दहशतवाद्यांना अटक केली नंतर इंडियन मुजाहिद्दीन ही अतिरेकी संघटना नष्ट झाली असा दावा केला जात होता. पण वाराणसी बॉम्बस्फोटानंतर इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेची पाळमुळे देशात किती खोलवर पसरलेली आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचे संस्थापक रियाझ आणि इक्बाल भटकल यांनी शहानवाझकडे वाराणसी बॉम्बस्फोटासाठी जबाबदारी सोपवली होती. त्यासाठी शहानवाझनं आजमगड मॉड्युलची मदत घेतली. आरीझ खान उर्फ जुनेद, जुनेद इंजिनिअर आहे. देशातील 5 बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग आहे. दिल्ली पोलीसांनी त्याच्यावर 5 लाख रुपयांचे इनाम ठेवलं आहे. अबू रशीद मंुबईत ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग आहे. खालीदने पाकिस्तानात दहशतवादाचे ट्रेनिंग घेतल आहे. आयएसआयशी त्याचे घनिष्ठ संबंध आहेत.

बॉम्ब बनवण्यात खालीद पटाईत आहे. मिर्झा शाहादाब बेग, बी ई इलेक्ट्रॉनिक्स, संकट मोचन बॉम्बस्फोटात याचं नावं पहिल्यांदा समोर आलं होतं. इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा हा टेक्नो सॅव्हि आहे. असदुल्ला अखतर, बीएससी इन फार्मासी, असदुल्ला हा पिडीजात श्रीमंत आहे. बडा खालीद स्फोटकांची जमावा जमव करण्याचं काम बडा खालीद करतो. मुंबईत ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बसफोटात आरडीएक्स हे स्फोटक कर्नाटकवरुन मंुबईत आणल्याचा याच्यावर आरोप आहे.

या सगळ्यांनी मिळून घडवला वाराणसीमधला बॉम्बस्फोट, पण या स्फोटाचा मास्टरमाईंड होता इंडियन मुजाहिद्दीनच्या आझमगड सेलचा प्रमुख डॉक्टर शहानवाझ खान. शहानवाझच्याच सांगण्यावरुन वाराणसी बॉम्बस्फोटासाठी महाराष्ट्राच्या मीडिया सेलची मदत घेतली गेली होती. याच मीडीया सेलने नवी मुंबईतून ई-मेल पाठवला होता. शहनवाझ आणि इतर इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांचा देशभरातील अनेक सिरीअल स्फोटातही समावेश आहे, आता तर या अतिरेक्यांचा शोध जवळजवळ प्रत्येक राज्यातील पोलिस करत आहे.

close